मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना सल्लासुद्धा दिला आहे. संजय शिरसाठ म्हणाले नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं करायचं असतं. तर ग्रामपंचयात आपोआप येते. अशा कुणाला दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात असे शिरसाठांनी (Sanjay Shirsat) नितेश राणेंना सांगितले आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे ?
“माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही.” निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही, अशी धमकी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
यावेळी ‘निर्भया’च्या वाहनांवरून संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निर्भया फंडातून घेण्यात आलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या शिंदे गटाच्या आमदारांसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जर निर्भयाची एखादी गाडी गेली असेल, तर ती थांबली पाहिजे. आम्ही ती गाडी द्या, असं म्हणत नाही. संबंधित गाड्या या निर्भयासाठीच वापरली गेली पाहिजे, असे संजय शिरसाठ म्हणाले आहेत.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट