हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकारामांनी महत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संतांचे महत्त्व यावर भाष्य केले. तसेच अनेक अभंगही म्हंटले.
मोदी म्हणाले, भारत ही संतांची भूमी आहे. तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. येवडच नव्हे तर स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा वीर सावरकर यांना शिक्षा झाली, तेव्हा तुरूंगात ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत,” असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
संत तुकाराम हे समाजच नाही तर भविष्यासाठीही आशाचे किरण बनून पुढे आहे. त्यांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग असतो. आजही देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मुल्यांच्या आधारे पुढे जात आहे. संतांच्या अभंगातून रोज नवी प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले.