औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप सेना युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपसात मिटवून घेण्याचे कसब जमणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युतीमुळे मोठी बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे. औरंगबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ देखील अशाच समीकरणाने गाजणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र संतोष माने यांनी अपक्ष उमेदवारीच जाहीर करून टाकली आहे. गंगापूर मतदारसंघात शिवसेनेची पक्ष बांधणीपहाता या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडणूक जिंकणे शक्य नाही. तसेच संतोष माने यांनी मागील वर्षांपासून येथे चांगलीच तयारी तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनी येथील जागेवर दावा सांगितला आहे.
संतोष मानेंनी जरी आपल्या उमेदवारीवर दावा सांगितला असला तरी त्यांचा दावा पूर्ण केला जाऊ शकत नाही. कारण भाजप नेते गिरीश महाजन यांनी मागील काही दिवसापूर्वी जाहीर केले आहे की ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत त्या त्यांच्याकडेच राहतील तर ज्या जागा भाजपने जिंकल्या आहेत त्या भाजपकडे राहतील. त्यामुळे पुर्वाश्रमाने शिवसेनेचा असणारा मतदारसंघ गतवेळी प्रशांत बंब यांच्या रूपाने भाजपने जिंकल्याने तेथे भाजपचा उमेदवार उमेदवारी करणार हे निश्चित असणार आहे.
इत्तर महत्वाच्या बातम्या –
मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश
आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार
आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात
राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया