कराड कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

सातारा | जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक झालेल्या ८७८ ग्रामपंचायतीमध्ये कराड, कोरेगाव, फलटण आणि माण तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम 23 व 24 फेब्रुवारी या या कालावधीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेले आहेत.

तहसिलदार कोरेगाव, फलटण, माण व कराड महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम व.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये तसेच आपले तालुक्यात उपलब्ध असलेले अधिकारी/कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन दि.२३/०२/२०२१ ते दि.२४/०२/२०२१ या कालावधीतील एक तारीख संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपलेस्तरावरुन निश्चित करुन द्यावी. संबंधित प्रामपंचायतींची सरपंच व उपसरपंच पदाची निवडीची कार्यवाही पुर्ण करुन केले कार्यवाहीचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करणेत यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’