धक्कादायक !!! वृद्ध महिलेच्या डोक्यात वार करून खून ; पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | साताऱा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पिंप्रद गावातील पारधी समाजाच्या वृध्द महिलेची हत्या करुन मृतदेह जाळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीने काल रात्री उशिरा महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून या महिलेची हत्या केली आणि शेतात मृतदेह जाळला आहे.

हत्या झालेल्या महिलेच नाव माहुली पवार असं असून फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी या गावची रहिवासी आहे. वृद्ध महिलेची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अजून पर्यंत स्पष्ट झालेले नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनेची गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक आरोपीच्या शोधत रवाना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

फिर्यादी मध्ये महिलेच्या नातेवाईकांनी संशयित म्हणून काही लोकांची नावे घेतली असून पुढील तपासणी सुरू आहे. आम्ही सर्व अँगलने तपासणी करत असून लवकरच या खुनामागील आरोपी कोण आहे आणि कारण काय आहे ते स्पष्ट होईल अस पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’