सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा त्रास जाणवू लागल्याने दवाखान्यात दाखल असणार्या ४ रुग्णांचे कोरोना अहवाल आज पोझिटिव्ह आले आहेत. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराड, उंब्रज, पाटण आणि फलटन या भागांतील सदर रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील डेरवण येथील १० महिन्याच्या बाळाचादेखील समावेश आहे. तसेच कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याचा आणि महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित मृताच्या नातेवाईकाचा समावेश असल्याचे समजत आहे.
दरम्यान, मागील काही दिवस जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आज अचानक चार कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्यात चिंताजनक वातावरण झाले आहे. सदर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. घाबरून जाण्याचे कारण नसून सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ वर पोहोचली असून आत्तापर्यंत २ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाचा पहिला रुग्ण बारा होऊन त्याला डिसार्ज देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा