व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Video अमर रहे ! शहीद जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील सुपुत्र शहीद जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव आज पहाटे साताऱ्यात दाखल झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळ- पाचवड रोडवर हजारोंचा जनसमुदाय गोळा झाला आहे. लोक रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून वीर जवान प्रथमेश पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. आज सोमवारी दि. 23 रोजी शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. जावलीकरांनी साश्रूनयनांनी प्रथमेश पवार यांना अखेरचा निरोप दिला.

शहीद जवान प्रथमेश पवार ‘अमर रहे अमर रहे’ वीर जवान प्रथमेश पवार अमर रहे च्या जयघोषाने जावलीकरांनी शाश्रु नयनांनी वीर जवानाला आदरांजली दिली. लष्करी जवानांच्या सजवलेल्या ट्रक्टर- ट्राॅलीतून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. कुडाळ येथे 11 वाजता प्रथमेश पवार यांना त्यांचे लहान भावाने भडाग्नी दिला. अंत्यसंस्कार समयी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, दिपकराव पवार उपस्थित होते.

सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना सेवा बजावताना जम्मू येथे गोळी लागून जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भरतीनंतर सीमा सुरक्षा दलात बेळगाव येथील प्रक्षिक्षण संपवून केवळ 3 महिन्यापूर्वीच ते जम्मू येथे लष्करात दाखल झाले होते. प्रथमेश यांच्या जाण्याने त्यांच्या गावावर आणि जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या मंगळवारी दि. 24 रोजी होणार आहे.