ठाण्यात कोठारी कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील कोठारी वेअरहाऊस 3 येथील दोन गोडाऊनला अचानकपणे आग लागली आहे. सुदैवाने या आगीमध्ये (Fire)  कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर (Fire) नियंत्रण मिळवले.

ठाण्यातील कोठारी कंपाउंड ,टिकुजी-नी-वाडी जवळ, मानपाडा येथील कोठारी वेअरहाऊस 3 येथील दोन गोडाऊनला अचानकपणे पहाटे 3 च्या सुमारास आग लागली होती. हि आग (Fire) ज्या ठिकाणी लागली त्याच्या जवळ प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि यामाहा बाईक शोरुम होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दल, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते.

सुदैवाने या भीषण आगीत (Fire) अद्याप कोणतीही जीवितहानी नाही तसेच कोणालाही दुखापत झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सदर आग 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली. या घटनेमध्ये मालमत्तचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब