मुख्यमंत्री ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंची पाठ ; ‘वर्षा’ ऐवजी कोल्हापूरकडे रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची खासदारकीची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा करत आपली स्वराज्य नावाची संघटना स्थापन केली. तसेच त्यांनी निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी सर्व आमदारांनाही पत्र लिहले. मात्र, त्यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूर गाठले. यावरून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.

एकीकडे काल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेत त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन करून आज दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ या निवासस्थानी शिवबंधन बांधण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, संभाजीराजे शिवबंधन हाती बांधणार का? कि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूरकडे जाणे पसंद केले.

संभाजीराजेंनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारल्यानंतर ते आता मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी संभाजीराजेंकडून तयारी केली जात आहे. शिवसेनेची अट नाकारल्यानंतर संभाजीराजे आता पुढील काय भूमिका घेणार? याकडे सेवेचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment