सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच प्रत्येक वर्ग या संकटाशी सामना करताना दिसतोय. पोलीस, आरोग्य विभाग त्याचबरोबर कोरोना लढ्यात सहभागी असलेलेही संक्रमणाला बळी पडतायत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांच्या आकड्यांमध्ये सध्या निकट सहवासीतांचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एका आमदारांचे स्वीय सहाय्यक कोरूना बाधित झाल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे.
संबंधित स्वीय सहाय्यक आमदारांच्या निकटवर्तीयांसह कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कायम संपर्कात होते. त्यामुळे हे पीए ज्यांना ज्यांना भेटले त्यांची पाचावर धारण बसली आहे. अनेकांची झोप उडाली असून काही जणांनी स्वतःहून स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. प्रशासनानेही संबंधित स्वीय सहाय्यक यांचे निकटवर्तीय विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
माण तालुक्याचे आमदार यांचे स्विय सहायक कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 8 दिवसात आमदार केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर तसेच अनेक राष्ट्रीय तसेच राज्यातील भाजपा चे नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे संपर्कातील काही भाजपा नेत्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.