हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील वातावरण नुकत्याच घडलेल्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण, मराठा आरक्षण मागणी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या कालच्या आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी मुंबईत ‘सह्याद्री ‘वर पार पडलेल्या मराठा आरक्षणाच्या उपमितीच्या बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारा यांच्यासोबत मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक मुद्यांवर चर्चा केली.
मराठा समाजबांधवांकडून आरक्षणाची मागणी केली जात असल्याने तसेच जालना येथे घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत ‘सह्याद्री’वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील बैठकीस उपस्थिती लावली होती.
यावेळी उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस व पवारांनी माध्यमांशी संवाद साधला पत्रकार परिषद संपल्यानंतर तिघेजण व्यासपीठावरून परतत असताना त्या ठिकाणी खा. उदयनराजे भोसले हेही पोहचले. ते त्यांच्यासोबत पुन्हा मिटिंग हॉलकडे रवाना झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जालना येथील घडलेल्या घटनेवरून सध्या राज्यभरात तीव्र कडकडीत बंद पाळण्यात आला.
#मराठाआरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण… pic.twitter.com/r0eUG3Uf25— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 4, 2023
दरम्यान, सातारा जिल्ह्यात सकाळ पासूनच व्यावसायिकांनी दुकाने खासगी वडाप वाहतूकदार एसटी प्रशासनाने आपली वाहने जागेवरच ठेवत बंदला पाठिंबा दिला. या घडामोडीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आजच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे याची चांगलीच चर्चा होत आहे
पालकमंत्री देसाईंनी घेतली होती खा. उदयनराजेंची भेट
मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीबद्दलची माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समितीचे सदस्य या नात्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला देण्यात येणार्या सवलतींविषयी पालकमंत्र्यांनी उदयनराजेंना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पोलीस अधीक्षक समीर शेख देखील उपस्थित होते.