कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माजी मंत्री व कराड दक्षिणचे सप्तपदी आमदार स्व. विलासराव पाटील- उंडाळकर व सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी भारती पोळ, भीमराव पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. त्यावर याबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. उदयसिंह पाटील यांच्या तक्रारीवर होणार कारवाई
कराड येथे काही रुग्णालयात 18 वर्षे वरील वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असल्याची तक्रार उदयसिंह पाटील यांनी केली. त्यावर विनय गौडा यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तर एका व्हाईलमध्ये १० जणांना लस दिली जात असताना काही ठिकाणी १२ १३ जणांना लस दिली जात असल्याची तक्रार थैर्यशील अनपट यांनी केली. या चर्चेत दीपक पवार, वनिता गोरे, अर्चना देशमुख, भारती रीळ, भीमराव पाटील यांनी सहभाग घेतला.