नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) ने लोकांना सतर्क केले आहे की, जर आपण परवानगीशिवाय कोणत्याही रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बर्याच वेळा लोकं त्यांचा छोटासा व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करतात, मग ते प्रसिद्ध ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरतात. यापुढे अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.
SBI ने ट्विट केले आहे
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करून लिहिले आहे की, आमच्या अधिकाऱ्यांनी अनेक खात्यांची दखल घेतली आहे ज्यात असे आढळले आहे की, बरेच जण प्रसिद्ध ब्रँडची नावे किंवा LOGO वापरत आहेत. हा पूर्णपणे दंडनीय गुन्हा आहे.
या कायद्यांतर्गत दंड देण्यात येईल
अशा प्रकारच्या लोकांवर भारतीय पॅनेल कोड – 1882, माहिती तंत्रज्ञान कायदा – 2000 (कलम 66C, 66D), ट्रेडमार्क कायदा – 1999 आणि कॉपीराइट कायदा – 1957 अंतर्गत कारवाई केली जाईल. या सर्व कायद्यांतर्गत असे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा केली जाते.
ग्राहकांनी बनावट ईमेलच्या जाळ्यात अडकू नये
याशिवाय SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सतर्क केले असून ते म्हणाले की, बनावट ई-मेल आमच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. SBI या ई-मेलशी संबंधित नाही. या प्रकरणात, आपण ईमेल उघडणे टाळावे. SBI ने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “बँक ग्राहकांना सोशल मीडियावर सतर्क राहण्याची विनंती केली आहे आणि कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजेसमुळे दिशाभूल होऊ नये, अशी विनंती केली जाते.”
बँकिंग सर्विससाठी अधिकृत पोर्टल वापरा
SBI ऑनलाइन बँकिंग सर्विस वापरणारे ग्राहक बँकेच्या अधिकृत पोर्टलद्वारे बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही बँकिंग सर्विसचा लाभ केवळ अधिकृत पोर्टलद्वारे घ्या असे SBI ने सांगितले आहे. असे न केल्यास आपण बँकिंग फसवणूकीचा शिकार होऊ शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.