SBI Customers Alert | SBI च्या करोडो ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘या’ फ्रॉडपासून व्हा सावध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SBI Customers Alert | मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचे जर भारतातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करोडो खातेधारकांना अलर्ट केले जारी केलेला आहे. कारण आजकाल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Customers Alert) ग्राहकांसोबत मोठ्या प्रमाणात स्कॅम आणि फसवणुकीची प्रकरणे वाढत चाललेली आहे. या संदर्भात आता प्रेस इन्फॉर्मेशन बिरो म्हणजे पीआयबी यांच्या चेक युनिटने सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेस बद्दल ग्राहकांना सतर्क केलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल, तर तुम्ही अत्यंत सावधानगिरीने कोणतेही आर्थिक व्यवहार करणे खूप गरजेचे आहे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

आजकाल सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सायबर गुन्हेगार देखील वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवत आहेत. अशातच आता रिवॉर्ड पॉईंट्स स्कॅम ही एक नवीन पद्धत आलेली आहे. ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. म्हणून ग्राहकांना पीआयबीने काळजी घेण्यात सांगितलेले आहे.

पीआयबीने जारी केलेल्या संदेशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने येणाऱ्या मेसेजपासून सावध राहा, असे म्हटले आहे. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी ग्राहकांना एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हा मेसेज एसबीआयने पाठवला आहे असे वाटत असले तरी हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. SBI कधीही SMS किंवा WhatsApp द्वारे लिंक्स किंवा APK फाईल्स पाठवत नाही. अशा परिस्थितीत, फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, अज्ञात फायली डाउनलोड करू नका किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. असा कोणताही संदेश नेहमी अधिकृत SBI चॅनेलद्वारे सत्यापित करा.

पीआयबीने ग्राहकांना सूचना दिल्या | SBI Customers Alert

पीआयबीने सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या मेसेजची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हे फक्त अधिकृत फोन नंबरद्वारे संपर्क करून करा. तुम्ही तुमच्या बँकेची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. आपण सतर्क राहिल्यास, आपण आर्थिक फसवणुकीचे बळी होण्याचे टाळू शकता.

फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्हाला कोणताही संदेश मिळाला तर तो कोणी पाठवला आहे ते शोधा. कृपया बँकेच्या अधिकृत चॅनेलद्वारे याची पडताळणी करा.
  • जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर त्यामध्ये दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. त्यात दिलेली कोणतीही फाईल डाउनलोड करू नका.
  • बँकेच्या नावावर कोणताही संशयास्पद संदेश आल्यास, अधिकृत माध्यमांद्वारे बँकेशी संपर्क साधून त्याची पडताळणी करा.
  • अधिकृत ॲप किंवा वेबसाइटद्वारेच पेमेंट आणि इतर व्यवहार करा.
  • तुम्ही तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती ईमेल, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे कधीही देऊ नये.