नवी दिल्ली । SBI ने आपल्या ग्राहकांसाठी मल्टी ऑप्शन डिपॉझिट योजना (Multi Option Deposit Scheme) आणली आहे. MODS ही टर्म डिपॉझिट्स सारखे असते जे बचत किंवा करंट खात्याशी जोडले जाते. MODS अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा SBI मार्फत तुम्ही ऑनलाईन सुरुवात करू शकता. हे व्याज दर बँकेने निश्चित केलेल्या मुदतीच्या कालावधीसाठी असते.
या खात्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या –
> आपण याची सुरूवात किमान 1000 रुपयांनी करू शकता. यानंतर तुम्हाला 1000 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
>> या खात्यात किमान 1 वर्षासाठी आणि जास्तीत जास्त 5 वर्षासाठी डिपॉझिट्स ठेवता येते.
>> या खात्यातील डिपॉझिट्सवरील व्याज फिक्स्ड डिपॉझिट्सप्रमाणेच उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के दराने अधिक व्याज मिळेल.
>> MODS अंतर्गत किमान 10 हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते आणि त्यानंतर 1 हजार रुपयांच्या गुणाकारात डिपॉझिट करता येते. जास्तीत जास्त डिपॉझिटची मर्यादा निश्चित केलेली नाही.
>> आपण हे खाते एका शाखेतून दुसर्या शाखेत ट्रान्सफर करू शकता.
>> SBI एफडी प्रमाणेच येथेही व्याज 2.9 टक्क्यांवरून 5.9 टक्के राहील.
>> मॅक्सिमम टर्म डिपॉझिट्सना मर्यादा नाही.
>> येथे टीडीएस डिडक्शनही लागू होईल.
>> हे ब्रँच आणि एसबीआय वेबसाइटद्वारे उघडता येऊ शकते.
>> आपण या खात्यात कोणालाही नॉमिनेट करण्यास सक्षम असाल.
>> MODS वर कर्ज सुविधाही उपलब्ध असेल.
>> आपण या खात्यात कोणालाही नॉमिनेट करण्यास सक्षम असाल.
दंड द्यावा लागेल
MODS शी संबंधित खात्यात किमान 3 हजार रुपये शिल्लकेची आवश्यकता असेल मग बँक शाखांचे लोकेशन कोणतेही असो. अशी परिस्थिती उद्भवल्यास ही रक्कम कमी झाली असेल तर सिस्टम स्वतःच MODS तोडेल आणि किमान रकमेची पातळी राखेल. जर MODS मध्ये पुरेशी रक्कम नसेल तर लिंक्ड केलेल्या खात्यात किमान ठेवीची पातळी राखली जाऊ शकत नसेल तर ग्राहकाला दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम बँक शाखेच्या लोकेशनच्या आधारावर निश्चित केली जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.