हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता SBI ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
22 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू
SBI चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 22 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. ग्राहकांनी आता हे लक्षात घ्या कि, SBI कडून 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या FD चा व्याज दर 80 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. त्यानंतर आता तो 5.50% पर्यंत वाढवला गेला आहे. पूर्वी तो 4.70% होता. नवीन दर 22 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
याशिवाय, आता बँकेकडून 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 4.65%, 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25%, 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 4.50%, तर 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.10% पर्यंत व्याजदर दिला जाईल.
SBI च्या 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.10%, 5 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर 6.10%, 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीवर 6.10%, 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठीचे दर 3% वर अपरिवर्तित राहील.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे नवीन व्याज दर
इथे हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीवर 6.90%, 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.60% दराने व्याज दर दिला जातो आहे. तसेच आता 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वर 6.75%, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वर 6.10% ते 6.60%, 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 5%, 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज दर मिळेल.
SBI ‘Wecare Deposit’
SBI कडून आपल्या SBI ‘Wecare Deposit’ योजनेच्या व्हॅलिडिटीचा कालावधी पुढील वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठीच्या डिपॉझिट्सवर 30 बेसिस पॉईंट्स अतिरिक्त प्रीमियम व्याज मिळेल. तसेच पाच वर्षांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल FD वर 0.80 टक्के (0.50 +0.30) जास्त व्याज मिळेल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या