हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता वर्ष संपण्याच्या 3 आठवड्यांपूर्वीच SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
13 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
SBI च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर आजपासून म्हणजेच 13 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबर 2022 रोजी SBI ने FD वरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली होती.
SBI चे नवीन एफडी दर (ज्येष्ठ नागरिकांसाठी)
7 ते 45 दिवस – 3.5%
46 ते 179 दिवस – 5%
180 ते 210 दिवस – 5.75%
211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 6.25%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 7.25%
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7.25%
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.75%
5 वर्षे ते 10 वर्षे – 7.25%
SBI चे नवीन एफडी दर (सर्वसामान्यांसाठी)
7 ते 45 दिवस – 3%
46 ते 179 दिवस – 4.5%
180 ते 210 दिवस – 5.25%
211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 5.75%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.75%
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी – 6.75%
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.25%
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.25%
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे