हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या महामारीच्या संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बर्याच कंपन्या टाळेबंदी करत आहेत.त्याचबरोबर काहींनी पगारामध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.अशा परिस्थितीत लोकांना पैशांची कमतरता भासू शकते आणि म्हणूनच देशातील सरकारी बँक असलेली एसबीआय सर्वात स्वस्त दराने कर्ज देत आहे.बँकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,यावेळी घरबसल्या फक्त ४ क्लिकमध्ये हे लोन तुम्हाला मिळू शकते.
एसबीआयने छोट्या व्यावसायिकांना आपत्कालीन कर्जाची ऑफर दिली आहे. अशा कर्जात व्यावसायिकांना सहा महिन्यांपर्यंत कोणताही हप्ता द्यावा लागणार नाही आहे.पुढील सहा महिन्यांकरिता ७.२५ टक्के सवलतीच्या दराने कर्जाची परतफेड करावी लागेल. त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज आणि इतर प्रकारची किरकोळ कर्जे देण्याबाबतही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत.
एसबीआय कडून फक्त ४क्लिकमध्ये गृह कर्ज मिळवा
>> एसबीआय ग्राहकांना फक्त या ४ क्लिकमध्ये प्री एप्रूव्ड पर्सनल लोन मिळू शकेल.
>> एसबीआय आपल्या योनो अॅपद्वारे ही सुविधा देत आहे.
>> यासाठी आठवड्यातून सात दिवस आणि २४ तासात कधीही अर्ज करू शकता.
>> या व्यतिरिक्त प्रोसेसिंग फीसुद्धा खूप कमी घेतली जाईल.
>> कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमची पात्रता देखील तपासू शकता.
>> याद्वारे आपण कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे समजू शकेल.
महत्वाच्या गोष्टी – कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, एसबीआय वेबसाइटसह, व्याज दर आणि अन्य आवश्यक अटी, https://bank.sbi/web/personal-banking/loans/personal-loans/pre-approved-personal-loans वर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
एसबीआय कडून एमरजंसी लोन कसे मिळवायचे ते येथे दिलेले आहे- ‘पीएपीएल <खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक>’ असे लिहून तुम्हाला 567676 क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला मेसेज करण्यात येईल की तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही.पात्र ग्राहक केवळ ४ स्टेप्समध्ये कर्ज मिळवू शकतील.
पहिली स्टेप – SBI YONO अॅप डाउनलोड करा आणि लॉगिन करा.
दुसरी स्टेप : आता Avail Now वर क्लिक करा.
तिसरी स्टेप – यानंतर कालावधी आणि रक्कम निवडा
चौथी स्टेप- त्यानंतर रेजिस्ट्रेड क्रमांकावर ओटीपी येईल.आपण ओटीपीमध्ये टाकताच आपल्या बँक खात्यात रक्कम जमा होईल.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.