हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर आता बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 50 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. ज्याचा मोठा फटका बँकेच्या ग्राहकांना बसणार आहे.
या दर वाढीनंतर आता बँकेचा EBLR 8.55 टक्के तर RLLR 8.15 टक्के झाला आहे. हे जाणून घ्या कि, 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. ज्यामुळे आता SBI चे होम लोन घेणाऱ्यांसाठीचा व्याजदर 0.50 टक्क्यांनी महागणार आहे.
आपल्या बजटवर कसा परिणाम होईल ते पहा
समजा आपण 35 लाख रुपयांचे होम लोन घेतले आहे. ज्याचा कालावधी 20 वर्षांचा आहे. यावर जुन्या 8.05 टक्के व्याज दरानुसार आपला ईएमआय 29,384 रुपये असेल. आता हे नवीन दर लागू झाल्यानंतर 8.55 टक्के व्याज द्यावे लागेल. ज्यानुसार ईएमआय 30,485 रुपयांपर्यंत वाढेल. यामुळे आता आपल्यावर दरमहा 1,101 चा अतिरिक्त भार पडेल. SBI
आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे काय होणार ???
बँकेकडून वाढवण्यात आलेला व्याजदर हा नवीन आणि सध्याच्या ग्राहकांसाठी लागू होईल. मात्र, सध्याच्या ग्राहकांना या किंवा पुढील महिन्यापासून नवीन व्याजदर भरावा लागेलच असे नाही. हे नवीन दर रीसेट तारखेपासून लागू होतील. रिसेट तारीख ही ती तारीख असते जेव्हा बँकेकडून आपल्याला दिलेल्या कर्जाच्या व्याजदराचे पुन्हा पुनरावलोकन करते. जे सहसा एका वर्षाच्या अंतराने होते. SBI
कालावधी वाढवला तर व्याजदर कमी होणार का???
हे लक्षात घ्या कि, काही कर्जदारांकडून व्याजाची रक्कम आधीप्रमाणेच ठेवण्यासाठी कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतात. यामुळे, अर्थातच, ईएमआय आधीप्रमाणेच चालू राहतो. ज्यामुळे आपल्यावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत नाही. मात्र कालावधी वाढल्याने जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे कालावधी वाढवण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा. SBI
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes
हे पण वाचा :
Karnataka Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा
‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न
ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा
Kisan Vikas Patra च्या गुंतवणूकदारांना मिळणार दुप्पट फायदा !!!
सराईत मोटारसायकल चोरट्याकडून 3 दुचाकी जप्त; सातारा शहर पोलीसांची कारवाई