हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कर्ज घेणे आता महागणार आहे. याचबरोबर नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या EMI मध्येही आता वाढ होणार आहे. SBI कडून नुकतेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 15 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. हे जाणून घ्या कि, जूनमध्येही एसबीआय कडून MCLR मध्ये वाढ करण्यात आली होती.
RBI ने गेल्या महिन्यांत रेपो दरात दोन वेळा वाढ केली आहे. ज्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांकडून होम लोन, पर्सनल लोन आणि ऑटो लोनच्या व्याजदरात वाढ केली गेली आहे. RBI ने या वर्षी पहिल्यांदा मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर जूनमध्ये दुसऱ्यांदा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. या दरवाढीनंतर रेपो दर 0.90 टक्क्यांनी वाढून 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.
नवीन दर अशा प्रकारे असतील
SBI ने याबाबत एक अधिसूचना जारी करत म्हटले की, आता एक वर्षाच्या कर्जासाठीचा MCLR 7.40 वरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सहा महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 7.35 वरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठीचा MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.80 टक्के करण्यात आला आहे.
‘या’ बँकांनीही MCLR मध्ये केली वाढ
सध्याच्या काळात अनेक बँकांकडून MCLR मध्ये वाढ करण्यात आला आहे. यामध्ये HDFC बँक आणि ICICI बँकेनेही MCLR चे दर वाढवले आहेत. HDFC कडून सर्व मुदतीच्या कर्जासाठीचा MCLR वाढवला गेला आहे. त्याच बरोबर ICICI बँकेने देखील सर्व मुदतीच्या कर्जासाठीचा MCLR 20 बेस पॉईंटने वाढवला आहे.
MCLR म्हणजे काय ???
MCLR हा बँकांचा लोन देण्याचा एक बेंचमार्क आहे. हे लक्षात घ्या कि, MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर देखील वाढतात. तसेच यामध्ये घट झाल्यास कर्जाचा दर देखील कमी होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI कडून मे आणि जूनमध्ये रेपो दरात वाढ करण्यात आली होती. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांनी आपल्या MCLR मध्ये वाढ केली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates
हे पण वाचा :
खुशखबर !!! Crude Oil पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार ???
Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
Investment : Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याज !!!
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???