Friday, June 9, 2023

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व प्रथम, एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा. यानंतर “New User Registration/Activation” वर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवर आपला अकाउंट नंबर, CIF नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि आवश्यक ती माहिती भरा. यानंतर, इमेजमध्ये दाखवलेला मजकूर बॉक्समध्ये भर, नंतर submit या बटणावर क्लिक करा.

असे केल्यानंतर एक ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल. तो भरा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर, हे एक पेज उघडेल, ज्यावर एटीएम कार्डाची डिटेल्स द्यावे लागतील. जसे की कार्ड नंबर, अकाउंट होल्डरचे नाव, व्हॅलिडिटी आणि पिन. यानंतर, प्रतिमेमध्ये दाखवलेला मजकूर भरा आणि submit करा.

एक टेम्परेरी यूझरनेम आणि पासवर्ड तयार करा, ते भरा तसेच submit करा आणि क्लिक करा. ज्यामुळे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आता टेम्परेरी यूझरनेम आणि नवीन पासवर्डसह लॉगिन करा. नंतर पर्मनन्ट यूझरनेम आणि किमान 8 अंकी पासवर्ड भरा. यानंतर आपण नेट बँकिंगची सुविधा वापरू शकता.

आजच्या युगात इंटरनेट बँकिंगने अनेक आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक कामे सुलभ केलेली आहेत. यामुळे आपल्याला बँकेच्या शाखेतही जाण्याची गरज भासणार नाही तसेच लांबलचक कागदपत्रे आणि वेळेची महत्त्वपूर्ण बचतही होत होईल. आपण नेट बँकिंग ऍक्टिव्हेट करून आपले बँक अकाउंटही ऑपरेट करू शकता. नेट बँकिंग हे बँकिंग इंडस्ट्रीसाठी एक चांगली सुविधा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.