हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) योजनेच्या गुंतवणूकीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मे 2020 मध्ये, एसबीआय कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय Wecare नावाची टर्म डिपॉझिट्स स्कीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला, यामध्ये फक्त सप्टेंबर 2020 पर्यंतच गुंतवणूक करता येणार होती, मात्र कोरोना महामारीमुळे यामधील गुंतवणूकीचा कालावधी वाढविण्यात आला.
एका मीडिया रिपोर्टनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की,” आता नागरिकांना मार्च 2023 पर्यंत SBI Wecare मध्ये गुंतवणूक करता येईल.” बँकेचे असे म्हणणे आहे की, बँकेने रिटेल टर्म डिपॉझिट्स विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI Wecare डिपॉझिट्स नावाची स्पेशल डिपॉझिट्स योजना लाँच केली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना रिटेल FD वर 5 वर्षे आणि त्याहून जास्त कालावधीसाठी 30 बेसिस पॉइंट्स अतिरिक्त व्याज मिळेल
किती व्याज दिले जाते ???
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या WeCare फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 5 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्याला 30 बेसिस पॉइंट्स जास्त व्याज मिळेल. सध्या, एसबीआय 5 वर्षांच्या मुदतीपर्यंतच्या FD वर सामान्य लोकांना वार्षिक 5.65 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास त्याला 6.45 टक्के दराने व्याज मिळेल.
SBI उत्सव डिपॉझिट स्कीम
स्टेट बँक ऑफ इंडियाने उत्सव डिपॉझिट स्कीम नावाची नवीन टर्म डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी ही योजना लाँच करण्यात आली असून यामध्ये आता 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.1 टक्के दराने व्याज मिळेल.
SBI च्या FD वरील असे असतील दर
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 2.90 टक्के ते 5.65 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 3.40 टक्के ते 6.45 टक्के व्याज मिळत आहे. बँकेकडून 13 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या व्याजदरात सुधारणा केली होती.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbi.co.in/documents/136/1364568/230920-SBI+WE+Care.pdf/cde6faa8-01fe-aeed-35ab-bd8f1a39fd82?t=1600845678718
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत किंचित वाढ, आजचे दर पहा
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
Salary Slip म्हणजे काय ??? त्यामध्ये कोण-कोणत्या बाबींचा समावेश असतो हे समजून घ्या
UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी