व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांना धमकीचा फोन; पोलीस ऍक्शन मोडमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, असा इशारा शरद पवारांना आला होता. पण या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला आहे. मात्र पोलीस आता याप्रकरणाची चौकशी करत आहेत

शरद पवार यांनी आज कुर्डुवाडीमध्ये येऊ नये, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती. या फोननंतरही शरद पवारांनी न घाबरता कुर्डुवाडीचा दौरा पूर्ण केला. दरम्यान, फोन करणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा फोन आला होता. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. हा फोन सोलापूर वरून आल्याची माहिती मिळत आहे.