हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : जर आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर आता एक सुवर्ण संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल Utsav Deposit ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 75 दिवसांसाठी पैसे जमा करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. मात्र 28 ऑक्टोबर 2022 पर्यंतच ही ऑफर सुरु असेल.
नुकतेच एसबीआय ने एका ट्विटद्वारे सांगितले की, “आता आपल्या पैशांना आपल्यासाठी कठोर परिश्रम करू द्या. आपल्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याजदरांसह ‘Utsav Deposit’ सादर करत आहोत!” चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात …
Utsav Deposit या योजनेचा कालावधी :
15 ऑगस्ट 2022 ते 28 ऑक्टोबर 2022
डिपॉझिट्सचा कालावधी
1000 दिवस
पात्रता
> एनआरओ टर्म डिपॉझिट्ससह देशांतर्गत रिटेल टर्म डिपॉझिट्स (2 कोटींपेक्षा कमी)
>> नवीन आणि रिन्यूअल डिपॉझिट्स
>> फक्त टर्म डिपॉझिट्स आणि स्पेशल टर्म डिपॉझिट्स
Let your finances do the hard work for you.
Introducing 'Utsav' Deposit with higher interest rates on your Fixed Deposits!#SBI #UtsavDeposit #FixedDeposits #AmritMahotsav pic.twitter.com/seMdVaOz0e— State Bank of India (@TheOfficialSBI) August 14, 2022
व्याज दर
या योजनेमध्ये SBI कडून 1,000 दिवसांच्या डिपॉझिट्सवर वार्षिक 6.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल.
अशा प्रकारे व्याज देण्यात येईल
स्पेशल टर्म डिपॉझिट्स मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक अंतराने – मॅच्युरिटीवर
TDS किती द्यावा लागेल ???
आयकर कायद्यानुसार दर लागू
मुदती आधीच पैसे काढणे
रिटेल टर्म डिपॉझिट्सनुसार लागू
SBI नवीन FD दर
एसबीआय कडून ठेवीदारांना सध्या 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 5.65% पर्यंत व्याज दिले जाते आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 6.45% पर्यंत व्याज देत आहे. 13 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbi.co.in/documents/136/1364568/220822-UTSAV+DEPOSIT.pdf
हे पण वाचा :
Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा
PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजचा भाव पहा
Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या