हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI YONO App : कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बँका देखील डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवंनवीन ऑफर्स आणत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याच्या त्रासातूनही सुटका मिळते. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC) नावाची एक नवीन ऑफर आणली आहे.
या अंतर्गत, आता ग्राहकांना SBI YONO App द्वारे पर्सनल लोन मिळेल. याअंतर्गत ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकेल. तसेच यासाठी त्यांना बँकेच्या शाखेत देखील जावे लागणार नाही. ही सर्व कामे घरबसल्या डिजिटल माध्यमातून पूर्ण केली जातील. याचा सर्वाधिक फायदा हा पगारदार वर्गाला होणार आहे.
SBI ने एक निवेदन जारी करताना म्हटले की, RTXC अंतर्गत पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांची पात्रता तपासणे, सर्व कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन आणि इतर प्रक्रिया या पूर्णपणे डिजिटल असतील. विशेषतः पगारदार वर्गाला लक्षात घेऊनच App द्वारे पर्सनल लोन देण्याची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
SBI चे अध्यक्ष असलेले दिनेश खारा यांनी सांगितले की, SBI तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग सुविधांचा सातत्याने प्रचार करत आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांच्या बँकिंग गरजा सुलभ करण्यासाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. SBI चा दावा आहे की, बँक सर्वात कमी व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. तसेच या SBI YONO App द्वारे लोन घेणाऱ्या ग्राहकांना कोणतीही सिक्योरिटी किंवा गॅरेंटरची गरज भासणार नाही.
‘या’ लोकांना मिळू शकेल लोन SBI YONO App
ज्या ग्राहकांचे SBI मध्ये सॅलरी अकाउंट आहे.
ज्या ग्राहकांची मिनिमम सॅलरी 15,000 रुपये प्रति महिना आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्रीय PSUs आणि नफा कमावणाऱ्या राज्य PSU चे कर्मचारी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, बँकेशी संलग्न किंवा नसलेल्या निवडक खाजगी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना देखील या सुविधेचा लाभ मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbiyono.sbi/app/
हे पण वाचा :
Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!
PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!
PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा
Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे