नवी दिल्ली । आपण कोरोनाव्हायरस (Coronavirus) काळामध्ये घर विकत घेण्याचा विचार करत असाल आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने शनिवारी जाहीर निवेदनात ही घोषणा केली आहे. बँकेच्या होम लोनवरील व्याज दर 6.70 टक्के पासून सुरू होत आहेत.
होम लोनचे नवीन दर जाणून घ्या
एसबीआयने म्हटले आहे की,” 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.70% पासून सुरू होतील. 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याज दर 6.95 टक्क्यांपासून सुरू होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. याशिवाय 75 लाख रुपयांपेक्षा जास्त लोनवर बँक 7.05 टक्के व्याज देणार आहे.
महिलांना अधिक फायदा होईल
एसबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,” महिलांना 5 बीपीएस सवलत मिळेल. महिला कर्जदारांना 5 बेसिस पॉईंट (0.05 टक्के) ची विशेष सवलत दिली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे.
योनो यूजर्सना ‘ही’ सूट मिळेल
याखेरीज YONO App यूजर्सनाही खास सवलत देण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने म्हटले आहे की,” YONO App द्वारे ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी आमच्या होम लोनच्या ग्राहकांकडून डिजिटल प्रोत्साहन म्हणून 0.05 टक्के सूटदेखील देण्यात येत आहे.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा