SBI चा ग्राहकांना झटका; FD वरील व्याज ०.४० % ने कमी केले, असा आहे नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी घट केली आहे. एसबीआयच्या एफडीवरील कमी करण्यात आलेले नवीन दर 27 मेपासून लागू झाले आहेत.

एसबीआयने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची माहिती दिली असून एका महिन्यात बँकेकडून ग्राहकांना मिळालेला हा दुसरा धक्का आहे. एसबीआयने मेच्या सुरूवातीस एफडीवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ग्राहकांना मिळणारा रिटर्नही कमी केला होता.

याशिवाय एसबीआयने बल्क डिपॉझिटसवरील व्याज दरातही कपात केलेली आहे. 2 कोटी किंवा त्याहून अधिकबल्क डिपॉझिटसवरील व्याजदरात बँकेने 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. बँकेकडून आता ठेवीदारांना बल्क डिपॉझिटसवर जास्तीत जास्त 3 टक्के व्याज मिळेल. आजपासून या दरांमधले हे बदल लागू करण्यात आले आहेत.

आता नव्या दरांनंतर एसबीआयच्या एफडीवरील वेगवेगळे टर्म व्याजदर जाणून घ्या.

7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9 टक्के व्याज

46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के व्याज

180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

211 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.1 टक्के व्याज दर

2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर 5.1 टक्के

3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर 5.3%

5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.4% व्याज दर

बँकांच्या एफडीवरील व्याज दर कमी होण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. गेल्या आठवड्यातच आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात कपात केली होती, त्यानंतर असे म्हटले जात आहे की लवकरच बँका आपल्या ग्राहकांसाठी कर्जाचे दरही कमी करतील. मात्र, एफडी दरातही कपात करण्याची भीतीही व्यक्त केली गेली.

तथापि, एसबीआयचे एफडी दर ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे आहेत आणि आपण त्याबद्दल येथे माहिती मिळवू शकता.

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे एफडी व्याज दर जाणून घ्या

1 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज

211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9 टक्के व्याज दर

1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी एफडीवर 5.6 टक्के व्याज दर

2 वर्ष आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.6 टक्के व्याज दर

3 वर्ष ते 5 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.8 टक्के व्याज दर

5 वर्ष व 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.2 टक्के व्याज दर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment