पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात (accident) झाला आहे. या दुर्घटनेत (accident) तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे या ठिकाणच्या मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत.
काय घडले नेमके?
आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान बस दरीमध्ये कोसळून भीषण अपघात (accident) झाला. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते. या सर्वांना बसमधून बाहेर काढण्यात (accident) आले असून त्यांना ॲम्बुलन्स द्वारे ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाण्यातही स्कूल बस उलटली
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खाजगी मिनी स्कूल बस काल सकाळच्या सुमारास उलटली (accident). या बसमध्ये सुमारे 17 ते 18 विद्यार्थी होते. बस उलटल्यानंतर स्थानिकांनी बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले (accident). या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते. ही घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये घडली होती. या बसमधील विद्यार्थी अंबरनाथ रोटरी स्कूलचे होते.
हे पण वाचा :
नवरात्रोत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट
सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा
UPI Lite द्वारे इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार ???
‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड; चाहत्यांमध्ये जल्लोष
किलिंग मशीनच्या भूमिकेत नागार्जुन; हायव्होल्टेज अॅक्शन सिनेमा ‘द घोस्ट’ रिलीजसाठी सज्ज