शाळकरी मुलाचा जेसीबीखाली सापडून मृत्यू,चालकाला पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर-वाघवाडी फाटा मार्गावरील अभियंतानगर येथे सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट या शाळकरी मुलाचा पहाटे जेसीबीखाली सापडून मृत्यू झाला. अपघात की घातपात याबाबत घटनास्थळावर उलटसुलट चर्चा होती. याप्रकरणी जीसीबी चालक जयमगंल बैजनाथ सिंह याला अटक करण्यात आली. पोलिसांनी अपघातातील जेसीबी ताब्यात घेतला आहे.

दगड काम करणार्‍या पाथरवट कुटुंबातील जीत बाढाईत, परशुराम व हर्षवर्धन पाथरवट हे तिघे एकत्रित रस्त्यावर गादी टाकून झोपले होते. सकाळी झोपलेल्या अवस्थेत हर्षवर्धनचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर बाजूला झोपलेले दोघेही सुरक्षित असल्याने घातपात की अपघात याबाबत सकाळपासून चर्चा होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अर्धी कवटी गायब असल्याने नेमका काय प्रकार आहे. पोलिसांनी याबाबत तपासाची मोहीम गतिमान केली होती. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत हर्षवर्धन याच्या उजव्या दंडावर जेसीबीच्या दाताचा व्रण दिसत होता. घटनास्थळी कोणताही पुरावा मिळाला नव्हता. यामुळेच पोलिसांनी याचा तपास दक्षतेने हाताळला. हा अपघात असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पाथरवट यांचे दुकान आहे. तेथून काही अंतरावर त्यांचे राहते घर आहे. रात्री झोपायला गेलेला मुलगा सकाळी उठलाच नाही. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी आक्रोश केला.

Leave a Comment