नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रत्येक राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती वेगवेगळी आहे, त्यानुसार ही राज्ये शाळा, कॉलेज, परीक्षांबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. दरम्यान, सिक्किम सरकारने देखील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. या राज्यात आता ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू होतील.
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील शाळा-कॉलेज १ जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय झाला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, शाळा-कॉलेज सुरू करण्यात येतील, असं सरकारने जाहीर केलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी विविध जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शाळा सध्या तरी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in