आजपासून शाळा सुरू; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय.

राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. पहिल्या दिवशी विविध कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमांसह अधिकाऱ्यांच्या भेटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं संबोधन सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ऐकण्याबाबतही निर्देश दिले आहेत.

काय आहेत नियमावली-

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यावं.

लसीकरण झालं नाही या कारणास्तव गैरहजर राहता येणार नाही.

विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची 100 टक्के हजेरी असणं आवश्यक आहे.

त्याचबरोबर लसीकरण झालंय त्यांना कोरोना चाचणीचं बंधन नसेल परंतु ती इतरांनी ही चाचणी करावी लागणार आहे.