हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळा सुरु करण्या संदर्भात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला होता. मात्र, सरसकट शाळा सुरू न करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येईल असे सांगत टास्क फोर्सच्यावतीने आज झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकितीही चर्चा करण्यात आली होती. यावेळी शिक्षण विभागाने काढलेल्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला काही मंत्र्यांनी स्थगिती देत या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर टास्क फोर्सने शाळा सुरु न करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला. याबाबत चरचा केल्यानांतर आज राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.
एक वर्षांपूर्वी मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. त्यानंतर आता कोरोनाचे प्रमाण राज्यात कमी झाल्याने त्या ठिकाणची माहिती घेत तेथील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून आठवड्यात बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले होते.