अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर, गडकरी म्हणाले,”वाहनांच्या किंमती कमी होतील”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरसाठी एक वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली. त्याच वेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की,” या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.”

रिसायकलिंगमुळे वाहनांच्या पार्टची किंमत कमी होईल, असे गडकरी म्हणाले. हायड्रोजन इंधनाच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे.

स्टीलवरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येईल
ते म्हणाले की,”स्टीलवरील कमी होणाऱ्या आयात शुल्काचा परिणाम लवकरच दिसून येईल. येत्या 15 दिवसांत याविषयी सविस्तर माहिती येईल, या पॉलिसीमुळे ऑटो सेक्टरला फायदा होईल, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि स्टीलच्या वाढत्या किंमतींना आळा बसेल. ड्यूटी स्ट्रक्चरमध्ये बदल केल्यास स्टीलचे दर कमी होतील. ते पुढे म्हणाले की,”एमएसएमई क्षेत्रासाठी दुप्पट वाटप झाले आहे.”

दररोज 40 किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य केले जाईल
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, दररोज 40 किमी रस्ता बांधकाम करण्याचे लक्ष्य पूर्ण केले जाईल. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले गेले आहे. एमएसएमई साठी बजट दुप्पट करण्यात आले आहे. रस्ता बांधकामात कोणतेही राजकारण केले जात नाही. यामध्ये सर्व राज्यांची काळजी घेण्यात आली आहे.

दीर्घकाळ प्रतीक्षित स्क्रॅपिंग पॉलिसी
महत्त्वाचे म्हणजे वाहन क्षेत्रासाठी वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी दीर्घकाळ प्रतीक्षित होती. आता खासगी वाहने 20 आणि व्यावसायिक वाहने 15 वर्षानंतर रस्त्यावर धडक मारणार नाहीत. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो आणि अशोक लेलँड यांच्या शेअर्समध्ये 2% वाढ झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.