नवी दिल्ली । मार्केट रेग्युलेटर SEBI ने सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (Silver ETF) ऑफर करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे शेअर बाजारातून गुंतवणुकीचे पर्याय वाढतील. सध्या, भारतीय म्युच्युअल फंडांना गोल्ड-केंद्रित ETF ऑफर करण्याची परवानगी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, Silver ETF सादर करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
SEBI ने सांगितले की, Silver ETF ही एक म्युच्युअल फंड योजना आहे जी प्रामुख्याने चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करते. SEBI ने म्हटले आहे की, जर म्युच्युअल फंड योजना कोणत्याही एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये गुंतवणूक करत असेल तर ती अंडरलाइंग गुड्स म्हणजेच फिजिकल कमोडिटी सेटलमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवू शकते.
Silver ETF योजनेत गुंतवणूक करण्याच्या अटी
Silver ETF स्कीममध्ये, प्रत्यक्ष चांदी किंवा चांदीशी संबंधित साधन सेबीच्या रजिस्टर्ड कस्टोडियनकडे जमा करावे लागते. Silver ETF योजनांमध्ये गुंतवणूक करताना काही अटी देखील समाविष्ट आहेत. जर एखाद्याने Silver ETF मध्ये गुंतवणूक केली, तर तो फंड फक्त चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये वापरला जाईल. म्युच्युअल फंड कंपनी हा फंड बँकेत जमा करून अल्पावधीत वापरू शकते.
Silver ETF चे काय फायदे आहेत जाणून घ्या
Silver ETF चा सरळ अर्थ असा आहे की, लोकं जसे स्टॉकची खरेदी आणि विक्री करतात, त्याच प्रकारे Silver ETF देखील खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते. यामुळे चांदीमध्ये कमाईची शक्यता वाढेल. शेअर्स किंवा स्टॉक्समध्येही असेच घडते की, जर एखाद्या गुंतवणूकदाराला फायदेशीर ट्रेड दिसला तर तो त्याची विक्री करून नफा कमावतो. Silver ETF चेही असेच होईल.