सोन्याच्या गुंतवणुकीबाबत SEBI चा इशारा – ‘इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्सनी डिजिटल गोल्डमध्ये ट्रेड करू नये’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (SEBI) इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्सना डिजिटल गोल्डचे ट्रेडिंग न करण्यास सांगितले आहे. SEBI ने म्हटले आहे की,’डिजिटल गोल्ड एक अन-रेगुलेटेड प्रॉडक्ट आहे, त्यात ट्रेडिंग करू नका.’ SEBI ने म्हटले होते की,’ काही रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स गोल्डसह अन-रेगुलेटेड प्रॉडक्ट खरेदी आणि विक्रीच्या कामात गुंतलेले आहेत, असे करणे नियमांच्या विरोधात आहे.’

SEBI चे हे स्टेटमेंट दिवाळीच्या अगदी आधी आले आहे. बाजाराचा वाढता मूड आणि सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ पाहता, लोक सोन्याच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत आणि अनेक इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स सतत गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत आणि गुंतवणुकीसाठी एक प्लॅटफॉर्मही देत ​​आहेत.

26 ऑगस्ट रोजी एक्सचेंजेसने स्टॉक ब्रोकर्सना डिजिटल गोल्डमध्ये ट्रेड करण्यास बंदी घातली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 10 सप्टेंबरपर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्डची विक्री थांबवण्याचे निर्देश स्टॉक ब्रोकर्ससह आपल्या सदस्यांना दिले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कारवाईनंतरही, SEBI ला असे आढळले की,’काही रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स डिजिटल गोल्डसह अन-रेगुलेटेड प्रॉडक्टची खरेदी, विक्री किंवा ट्रेड करण्यासाठी प्लॅटफॉर्म देत आहेत.’

SEBI ने म्हटले आहे की,”इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स डिजिटल गोल्डसाठी सल्ला, वितरण किंवा गुंतवणुकीशी संबंधित सेवा देऊ शकत नाहीत आणि अशा अनियमित रेग्युलेशनवर SEBI एक्ट 1992 अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते.” SEBI ने कडक शब्दांत म्हटले आहे की,”इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्सनी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीत इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्सचा सल्ला आणि सहभाग सेबी एक्ट 1992 आणि सेबीच्या 2013 च्या नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे SEBI ने इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्सना अशा अनियमित कामांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.”

नियम काय आहेत ?
नियमांनुसार, एक्सचेंजच्या सर्व सदस्यांनी सिक्युरिटीज आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज व्यतिरिक्त इतर ट्रेड करू नये. जर त्यांनी असे केले तर ते नियमांचे उल्लंघन होईल. Paytm Money इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर म्हणून रजिस्टर्ड आहे. पेटीएम मनी, 10 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,’ डिजिटल गोल्ड फक्त Paytm App वर उपलब्ध असेल, Paytm Money वर नाही.’

Paytm Money ने म्हटले होते की,” डिजिटल गोल्ड हे Paytm ने लॉन्च केलेले प्रॉडक्ट आहे, जे स्टॉक ब्रोकर किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर नाही. यामुळे, आमच्या सेवा प्रभावित होणार नाहीत आणि आपण Paytm App वर अखंडपणे आपले डिजिटल गोल्ड खरेदी, विक्री किंवा ट्रॅक करणे सुरू ठेवू शकता.”

Leave a Comment