महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही; राजू शेट्टी यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शेट्टी यांनी आज पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनत होते. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो. मात्र, आता स्वाभिमानी ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे हे ते विसरले आहेत. महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथे नुकतीच ऊस परिषद पार पडली. यावेळी शेट्टी यांनी आघाडी सरकारमध्ये राहायचे कि नाही याबाबात लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर शेट्टी यांनी पुणे इथे आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाली. त्यावेळी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी शब्द देत सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यानी दिलेला शब्द पाळला नाही.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न या महाविकास आघाडी सरकारला सुटत नसतील तर मी महाविकास आघाडी सरकारवर का समाधानी असेल? असा सवाल यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यावेळी उपस्थित केला. राजू शेट्टी यांनी यापूर्वी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला होता.

Leave a Comment