हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक देशांत प्रार्दुभाव झालेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने भारताचीही चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने उद्यापासून म्हणजे 16 डिसेंबरपासून कलम 144 लागू करण्यात आली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दि. 16 डिसेंबरपासून मध्यरात्रीपासून मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. न मुंबई पोलिसांकडून याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान, ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 16 डिसेंबर पासून कलम 144 लागू करण्यात आले आहे.
राज्यातील ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील सोळा दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात येत असल्याची माहिती शेख यांनी दिली आहे.