हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील महत्त्वाच्या 12 विषयांवर तब्बल एक तास चर्चा केली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वरून आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रीया दिली आहे. ‘ अशा वेळी चर्चा तर होणारच अशा शब्दात राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोणाच्याही मध्यस्थ शिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्त्वाचं असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
…तर राजकीय संदर्भ कशाला?
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, या भेटीचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी ते काढावेत केंद्र आणि राज्यात संघर्ष नसावा राज्यांच्या संकट काळात केंद्रांना पंतप्रधानांनी मदत करावी राज्यात आणि केंद्रात सुसंवाद हवा ही राज्याची भूमिका आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक तास महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले तर संघर्षाची भाषा कशाला?असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच आता महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली आहे.
या भेटीवरून राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत विचारले असता आता बैठक सुरू असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. तर पंतप्रधान आणि ठाकरे यांच्यातील ही भेट 10 ते 15 मिनिटे चालेल असं बोललं जात होतं. पण भाजप नेत्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही ते चुकतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.