हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ग्रीन टी पिणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. विशेषतः जे लोक डाईट वर असतात ते वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी कैमेलिया साइनेन्सीस या वनपस्तीच्या पानापासून बनवलं आहे. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी तत्वे, यामुळे याचा वापर वाढताना दिसत आहे. परंतु ग्रीन टीचे सेवन केल्याने फायद्या सोबत काही दुष्परिणाम पण होतात का याचीही माहिती असं आवश्यक आहे.
ग्रीन टी चे फायदे-
वजन कमी-
ग्रीन टीमुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये एक नैसर्गिक अँटी ओक्सीडेन्ट असते. यामुळे शरीरातील टॉक्सीस घटक बाहेर उत्सर्जित होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या चहाच्या जागी ग्रीन टी घ्या.
मधुमेहाशी फायदेशीर-
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी ग्रीन टीचे सेवन नक्की करावे. ग्रीन टी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते असे मानले जाते. तसेच ज्यांना मधुमेह नाही, त्यांनी ग्रीन टी प्यायल्यास त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
कॅन्सर पासून बचाव-
ग्रीन टी कर्करोगापासून आपला बचाव करते . यामध्ये असलेले पॉलीफेनॉल ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात. ते प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. ग्रीन टी त्वचा, यकृत, स्तन, आतडे यांपासून होणाऱ्या कॅन्सर ला संरक्षण प्रदान करते.
ग्रीन टी मुळे होणारे नुकसान-
पोटाशी संबंधित त्रास –
ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ, गॅस इत्यादी अडचणी निर्माण होऊ शकतात. ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे तत्व असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात ऍसिडिटी होऊ शकते.
डोकेदुखी-
ग्रीन टीच्या सेवनाने काही लोकांना डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यातील असलेल्या कॅफेन हे डोकेदुखीचं कारण बनू शकत.
झोपेची समस्या-
ग्रीन टीच्या सेवनाने झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे तुमचा निद्रानाश होऊ शकतो. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची शक्यता असते.