Seema Haider: मुंबई पोलिसांना बुधवारी एक धमकीचा फोन आला होता. कॉलर मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकी देत म्हणाला की, ‘सीमा हैदरला पाकला पाठवा, अन्यथा 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला होईल आणि त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार राहील’. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत. याआधीही मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला असे अनेक फोन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी (12 जुलै) रोजी आला होता.
सीमा हैदर भारतात कशी आली?
नोएडामध्ये राहणाऱ्या सचिनच्या संपर्कात सीमा हैदर (Seema Haider) PUBG गेमच्या माध्यमातून आली. दोघेही प्रेमात पडले. यानंतर सीमा चार मुलांसह नेपाळला पोहोचली. तिथून ती बसने भारतात आली आणि नोएडामध्ये सचिनसोबत लग्न केल्यानंतर 50 दिवस तिथेच राहिली. गुपित उघड झाल्यावर सीमा आणि सचिनला अटक केली जाते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
सीमा पाकिस्तानातील जैसमाबाद येथील रहिवासी आहे –
सीमा हैदर या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहेत. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा यांच्याशी 2014 मध्ये झाला होता. तसेच तिला चार मुले आहेत. 2019 मध्ये गुलाम हैदर कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता. तेथून तो सीमाला पैसे पाठवू लागला. सीमाच्या म्हणण्यानुसार, 2019 नंतर तो कधीही घरी परतला नाही.
सीमा यांच्या पतीने अपील जारी केला – Seema Haider
कराचीतील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर सीमा (Seema Haider) आणि तिच्या मुलांची कहाणी भारतीय मीडियामध्ये समोर आली तेव्हा सीमाचे पती गुलाम हैदर यांनी सोशल मीडियावर सौदी अरेबियाला आवाहन केले आहे असे सांगितले. मात्र यावर सीमा हैदर म्हणाली की तिचा नवरा ओव्हरअॅक्टिंग करतो. तो जसा दिसतो तसा तो नाही.
याआधी सुद्धा सीमा हैदरने घरातून पळून जाऊन लग्न केले होते –
पाकिस्तानातील जेकबाबाद येथे राहणारे गुलाम हैदर आणि सीमा यांचीही (Seema Haider) योगायोगाने भेट झाली. चुकून एक चुकीचा नंबर डायल झाला, सीमाने परत कॉल केला तेव्हा दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मात्र सीमाचे कुटुंबीय तिच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे सीमाने घर सोडले आणि पळून जाऊन कोर्टात लग्न केले. पळून जाण्याचे आणि लग्नाचे प्रकरण नंतर स्थानिक पंचायतीपर्यंत पोहोचले. जिथे गुलाम हैदरलाही दंड भरावा लागला होता.