हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याच दिसत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचा इशारा दिल्यानंतर शिंदे गटाने सुनील प्रभू याना प्रतोद पदावरून हटवून भरत गोगावले यांची प्रतोदा पदी निवड केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.अस शिंदे म्हणाले.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर शिवसेनेनं त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांना गटनेते बनवलं. परंतु ही निवड बेकायदेशीर असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेच्या 45 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मला आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे गटनेता मीच असल्याचं शिंदे म्हणाले होते.