भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – फळांचा ज्यूस (fruit juice) आपल्या आरोग्यासाठी चांगलाच लाभदायक असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी फळांचा ज्यूस घ्यायचा सल्ला देत असतात. मात्र भिवंडीमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक फळविक्रेता चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस (fruit juice) विकत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/hUA7SdD0S4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 18, 2022
कुठे घडला हा प्रकार ?
भिवंडी शहरातील टेमघर येथील साईबाबा मंदिरा समोर हा प्रकार घडला आहे. साईबाबा मंदिरासमोर एक ज्युसवाला चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस (fruit juice) बनवून विकत होता. त्याचा आता पर्दाफाश झाला आहे. आज सकाळी स्थानिक नागरिक ज्यूस (fruit juice) घेण्यासाठी दुकानावर गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीला अननस आणि इतक फळंही सडलेल्या अवस्थेत आढळून आली. एवढंच नाहीतर अननस इतके सडले होते की, त्यात अळ्यासुद्धा सापडल्या.
यानंतर अशा फळांचा ज्यूस (fruit juice) लोकांना देतात का? असा सवाल करत एका जागृक नागरिकाने हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर त्याने ज्यूसच्या (fruit juice) हातगाडीवरील सडलेली फळे त्यात पडलेले किडे याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या फळ विक्रेत्याला बेदम चोप दिला आणि सर्व फळं फेकून दिली.त्यामुळे आता प्रशासन या ज्यूसवाल्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
मोबाईल नंबरशिवाय PVC आधार कार्ड कसे तयार करावे हे जाणून घ्या
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
अजित दादा खंडणी, काम अडविण्यात तुमचेच कार्यकर्ते : आ. जयकुमार गोरे
स्वाभिमानी संघटना भीक मागून भागवणार सदाभाऊंच्या उधारीचे पैसे