रामायणातील ‘आर्य सुमंत’ना झाली देवाज्ञा; ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील ५०-६०च्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीत त्यांनी त्यांच्या राहत्या घरी सकाळ ७ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मागील बऱ्याच काळापासून त्यांना उत्तर वयातील अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांनी ५० च्या शतकापासून सिनेसृष्टीत अनेक विविध चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी चरित्रात्मक भूमिकांमध्येही अव्वल काम केले होते. त्यांनी १९९८ साली दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत ‘आर्य सुमंत’ हे पात्र साकारले होते. त्यांच्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती.

वृत्तानुसार, चंद्रशेखर यांचा नातू विशाल शेखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना खूप ताप आल्यामूळे त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथे असणाऱ्या क्रिटी केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्यानंतर त्यांना लगेच घरीही आणण्यात आले होते. अखेरच्या दिवसांमध्ये आपण कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करावा अशी आजोबांची इच्छा होती, असे त्यांच्या नातवाने माध्यमांना सांगितले.

चंद्रशेखर यांनी कलाविश्वात एक ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या. हैदराबादमध्ये जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी १९५३ साली व्ही. शांताराम यांच्या ‘सुरंग’ मध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारली होती. यानंतर ते ‘कवी’, ‘मस्ताना’, ‘बरादरी’, ‘काली टोपी लाल रुमाल’, ‘स्ट्रीट सिंगर’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत दिसले. पुढे सत्तरीच्या दशकात त्यांनी ‘कटी पतंग’, ‘हम तुम और वो’, ‘अजनबी’, ‘महबूबा’, ‘अलग-अलग’, ‘शक्ती’, ‘शराबी’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here