हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : आता लवकरच अर्थसंकल्प 2023 चा सादर होणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी ही सूट 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल, अशी आशा लोकं बाळगून आहेत. प्रत्यक्षात असे होईल की नाही हे 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र भारत सरकारकडून त्याआधीच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करत म्हंटले की, आता 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या नागरिकांकडे फक्त पेन्शन आणि त्यांचे उत्पन्नाचे स्रोत म्हणून बँकेचे व्याज असेल त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची गरज नाही. यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. वास्तविक, अशा ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स आणि रिटर्न फाइल करणे अवघड जात होते. त्यादृष्टीने सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
जोडण्यात आले नवीन कलम
हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना ही सूट देण्यासाठी सरकारकडून इन्कम टॅक्सच्याकायद्यात नवीन कलम समाविष्ट करण्यात आले आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) मध्ये 75 वर्षांवरील नागरिकांना दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स 1961 नियमात सुधारणा करण्यात आली असून त्यामध्ये कलम 194-P हे नवीन कलम जोडण्यात आले आहे. सरकारने केलेल्या या बदलाची माहिती बँकांना देण्यात आली आहे.
अर्थमंत्र्यांची घोषणा
गेल्या वर्षीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटले आहे की, या नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इन्कम टॅक्सच्या नियम 31, नियम 31A, फॉर्म 16 आणि 24Q मध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार, आता 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी ITR दाखल करणे जरुरीचे नाही. तसेच त्यांचे ज्या बँकेत खाते असेल, ती बँक आपोआप उत्पन्नावरील टॅक्स कट करून रिटर्न भरेल. यासाठी नागरिकांना 12 BBA फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागणार आहे.
आता कोणाकोणाला टॅक्स मधून सूट देण्यात आली
सरकारकडून सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स सूट दिली जात आहे. मात्र, यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे आवश्यक आहे. याद्वारे तो त्याच्याकडून घेतलेल्या TDS वर रिफंड क्लेम करता येईल. 2.5 ते 5 लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागतोच, मात्र तो इतका कमी असतो की सूटमध्येच एड्जस्ट केला जातो.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/individual/return-applicable-2
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या