हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक हे आता तरुणपणी नोकरी करताना त्यांच्या म्हातारपणीची सोय करून ठेवतात. निवृत्तीनंतर त्यांचे आयुष्य सुखात समृद्धीत जावो, त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक कमतरता भासू नये. यासाठी ते आत्तापासूनच पैशांची बचत करत असतात. तुम्हाला देखील तुमच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही एका चांगल्या फंडात ही गुंतवणूक (Senior Citizen Saving Scheme) करू शकतात. आजकाल बाजारात अनेक अशा शासकीय आणि अशासकीय योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळेल.
आजच्या या लेखांमध्ये आपण अशाच काही योजनाबद्दल (Senior Citizen Saving Scheme) जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैशांची गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुमचे पैसे अत्यंत सुरक्षित असणार आहे. तुम्हाला चांगला परतावा देखील मिळणार आहे. आता या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय पेन्शन सिस्टम
तुम्हाला जर निवृत्तीनंतर दर महिन्याला पगारासारखी पेन्शन हवी असेल, तर हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. तुम्ही जर या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. यामध्ये भारतातील कोणताही नागरिक ज्यांचे वय 18 ते 70 दरम्यान आहे, ते योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर इमर्जन्सी फंडाची गरज असेल, तर तुम्ही या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढू शकता.
अटल पेन्शन योजना | Senior Citizen Saving Scheme
अटल पेन्शन योजना ही सरकारची योजना आहे. तुम्हाला निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न पाहिजे असेल, तर ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. 18 ते 40 वयोगटातील कुठलाही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला 1000 पासून 5000 पर्यंत पेन्शन मिळते.
EPFO
EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या योजनेत जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा अधिक काळ पैसे जमा केले असतील, तर तुमच्या निवृत्तीनंतर पेन्शनसाठी तुम्हाला चांगले व्याज मिळते. त्याचप्रमाणे रक्कम देखील चांगली मिळते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
ही योजना पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. ही एक छोटी बचत योजना आहे. परंतु यावर तुम्हाला खूप चांगले व्याज मिळते. तुम्ही एका खात्यात जवळपास 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुमचे जर जॉईंट अकाउंट असेल तर तुम्ही दरवर्षी 15 लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक करू शकता. या योजनेवर 7.4% पर्यंत व्याज मिळते.
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडामध्ये नक्कीच रिस्क असते. परंतु जर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला आणि दीर्घ मुदतीसाठी जर तुम्ही यात गुंतवणूक केली, तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल. तुम्ही 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल.