हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून आज त्याचा समारोप आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटन प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना गोमूत्रावर संशोधन करा सांगणार्या व गटारीतील गॅसवर स्वयंंपाक बनवता येऊ शकते, असे वक्तव्य करणारा असा पंतप्रधान यापुढे कधीच नसावा. पंतप्रधानांची अनेक वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत. पंतप्रधानांच्या गैर भाषणाला प्रचंड टाळ्या पडतात. पण, विरोध करायची हिंमत आहे का?, असा सवाल रझा यांनी केला आहे.
नाशिक येथे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज संमेलनाचा समारोप होणार आहे. या दरम्यान जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांच्या हस्ते विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी तर म्हणाले की, पंतप्रधानांच्या गैर भाषणाला प्रचंड टाळ्या पडतात. पण, विरोध करायची हिंमत कुणीही करत नाही. नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरविण्याची ताकद विद्रोही साहित्यिकांच्यात आहे. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साहित्य संमेलनात टीका केली गेल्यामुळे भाजप नेत्यांकडून याबाबत काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहावे लागणार आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर सुद्धा साहित्य संमेलनात टीका करण्यात आली आहे.