हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडड्यावर पुनरागमन करत आहे. 2023 मध्ये शाहरुखचा पठाण चित्रपट रिलीज होणार असला तरी तो आका गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुखचे तब्बल तीन चित्रपट 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पठाण हा चित्रपट बिग बजेटचा असून यामध्ये फक्त शाहरुख खानसोबत सलमान खान हा देखील दिसणार आहे. पठाण चित्रपटामध्ये सलमान खानचा कॅमिओ आहे. त्यासाठी त्याने काहीच पैसे घेतलेले नाहीत.
शाहरुख खान प्रमाणे सलमान खान याचे देखील 2023 मध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सर्वात अगोदर सलमान याची झलक पठाण चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये स्टारर्सने मोठी तगडी फी घेतली आहे. एकट्या शाहरुख खान यानेच पठाण चित्रपटासाठी 100 कोटी घेतले आहेत.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटासाठी जर 100 कोटी रुपये घेतले असतील तर सलमान खान याने पठाण चित्रपटातील कॅमिओसाठी नेमके किती कोटी घेतले आहेत? याची चर्चा सोशल मीडियावर जात आहे. मात्र, या कॅमिओसाठी सलमान खान याने काहीच फी घेतली नसून त्याने हा कॅमिओ फ्री केलेला आहे.