महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

0
117
Shambhuraj Desai Mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी, असेही देसाई यांनी सांगितले.

आज मुंबईतील मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागातीळ पोलीस अधिकाऱ्याची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्यासह पर्शिम महाराष्ट्रातील पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी.

‘या’ दिल्या महत्वाच्या सूचना

यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकार्याना काही महत्वाच्या सूचनाही केल्या. यावेळी देसाई म्हणाले की, उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे, राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी, महामार्गावरील पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची व्यवस्था करावी, मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here