कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून भाजपकडून यजाकरे सरकारवर टीका केली जात आहे. मध्यन्तरी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केयी होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तरही दिली. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात असल्याचे म्हणत देसाई यांनी मंत्री राणेंवर हल्लबोलही केला आहे.
आज शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री नारायण राणे यांना इशाराच दिला. देसाई म्हणाले की, आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री आहोत. नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षाने सांगितले आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितले तर जशास तसे उत्तर देण्याची आमच्यात ताकद आहे. आणि तसे उत्तरही आम्ही देऊ.
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची नुकतीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केली. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांवर केलेली आगपाखड यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधून टोलेबाजी केली जात आहे. चिपळूण दौऱ्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती.