हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाबाहेर एकत्र दिसले यावेळी त्यांनी गप्पादेखील मारल्या. त्यांना एकत्रित पाहताच अनेकांच्या भुवया उंचावळ्या. मात्र, यावर शिंदे गटाचे आमदार तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटल. यावेळी फडणवीसांनी त्यांना सांगितलं असेल, तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र काम करा.” असे देसाई यांनी म्हंटले.
शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “यापूर्वी कधी उद्धव ठाकरे असे टक्के-टोमणे किंवा घालून पाडून बोलत नव्हते. परंतु संजय राऊतांची संगत वाढल्यापासून ते असं बोलायला लागले आहेत.
मी त्यांना म्हटलं, तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, त्यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा तुमच्याजवळ आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. पण त्यांनी ऐकलं नाही. संजय राऊत नेमकं काय करत आहेत ते कोणासाठी काम करत आहेत हा संशोधनाचा विषय असल्याचे देसाई यांनी म्हंटले.